शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

यवतमाळ जिल्ह्यात २१ महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:27 IST

जिल्ह्यात ३९.७० मिमी. पावसाची नोंद : चार जनावरे दगावली, पाच घरांची पडझड, सव्वादोनशे हेक्टरवरील ज्वारी, तीळ, भुईमूग पिकाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात मंगळवारी तब्बल ३९.७० मिमी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. २१ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांना देखील फटका बसला.

यवतमाळ तालुक्यातील हिवरी ६८.२५, कोळंबी ६६, दारव्हा तालुक्यातील दारव्हा १००.२५, चिखली ७०.२५, मांगकिन्ही ८०.५०, लोही ७०.२५, बोरी ६९, लाडखेड ८५.७५, महागाव ७९.२५, आर्णी तालुक्यातील आर्णी ७९.२५, जवळा ७९.२५, बोरगाव ७९.२५, पुसद मधील शेंबाळपिंपरी ७६,७५, खंडाळा ८३.७५, उमरखेड तालुक्यातील मुळावा ६६.७५, विद्धूळ ८१.२५, मारेगाव तालुक्यातील जळका ६५.२५, हारी तालुक्यातील खडकडोह ९४.२५, मुकुटबन ७५.२५, केळापूर तालुक्यातील करंजी ६५.२५ आणि राळेगाव तालुक्यातील वरध मंडळात ६५.२५ मिमी. इतका पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे यवतमाळ, केळापूर तालुक्यातील पाच घरांची पडझड झाली. वणी, मारेगाव, झरी येथे तीन जनावरे दगावली. तर राळेगाव तालुक्यातील मांडवा येथे वीज कोसळून नाना लोणकर यांचा बैल ठार झाला. आर्णी तालुक्यातील आठ गावांतील १८० आणि केळापूर तालुक्यातील सात गावांतील ३५ हेक्टरवरील तीळ, भूईमूग, मूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. 

पेरणीसाठी घाई नकोजिल्ह्यात दाखल झालेला मान्सून विक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून केले जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून जोरदार बरसेल.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रियजूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस बरसल्या नंतरच पेरणी करावी लागणार आहे. यापूर्वी १९६१, ला २१ मे रोजी मान्सून आला होता. १९६२ ला १२ मे रोजी मान्सून आला. १९६४ मध्ये २६ मे ला आणि २०२५ ला २६ मे ला मान्सून दाखल झाला आहे. तब्बल ६१ वर्षांनंतर हा मान्सून राज्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात आणि विदर्भात गत काही वर्षात एकाच दिवशी मान्सून दाखल होत आहे.

जिल्ह्यात वीक मान्सूनजिन्ह्यात दरवर्षी ७ ते १० जूनव्या सुमारास मान्सून सक्रिय होतो. यानंतर पावसात खंड पडतो. या वर्षी आठवडाभरापूर्वी मान्सूनचे वारे सक्रिय झाले. २६ तारखेला मान्सून विदर्भात आणि महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यात दाखल झाला आहे. प्रारंभी वीक स्वरूपाचा मान्सून आहे. ३१ मेपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. १ तारखेपासून पावसाचा जोर कमी होऊन अधून मधून पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या काळात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करता येणार आहेत. मात्र, पेरणी करणे सर्वाधिक धोकादायक असणार आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळRainपाऊस