जिल्ह्याला हव्या २०० कोटींच्या नोटा

By Admin | Updated: November 11, 2016 02:11 IST2016-11-11T02:11:10+5:302016-11-11T02:11:10+5:30

५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला.

200 crore for the district | जिल्ह्याला हव्या २०० कोटींच्या नोटा

जिल्ह्याला हव्या २०० कोटींच्या नोटा

बँकांवर वाढला ताण : नोटा बदलून घेण्याची नागरिकांना घाई, ग्रामीण भागात व्यवहार ठप्प
यवतमाळ : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. बुधवारी बँका बंद राहील्या. गुरूवारी बँका उघडताच खातेधारकांनी प्रचंड गर्दी केली. सर्वच ठिकाणी बँका उघडण्यापूर्वीच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. शहराच्या तुलनेत ग्रामीण क्षेत्रात मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी दिवसभर कायम होती. युवक, युवतींपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी बँकेकडे धाव घेतली. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियासह खासगी बँकांनी रिझर्व बँकेकडे चलन बदलासाठी २०० कोटींची मागणी केली. हा पैसा गुरूवारी येण्याची अपेक्षा होती. मात्र गुरूवारी हा पैसा पोहोचला नाही. यामुळे बँकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले १०० आणि ५० चे चलन काढावे लागले. दुपारनंतर हेही चलन संपले. १० रूपयांच्या नोटांचे चलन वितरित करण्यात आले. शुक्रवारी नवीन चलनातील २०० कोटींच्या नोटा पोहोचण्याचा अंदाज वर्र्तविला जात आहे. (शहर वार्ताहर)

खासगी बँकांतील नोटा सायंकाळी संपल्या
कॉसमॉस बँक आणि इंडियन ओवर्सिस बँकेमधील चिल्लर नोटा सायंकाळी संपल्या. यामुळे बँकांनी सायंकाळी केवळ पैसे जमा केले. चलन मिळताच नवीन पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. यामुळे अनेक ग्राहकांना पैसे भरल्यानंतरही चिल्लर नोटा मिळाल्या नाही. सावला नावाच्या ग्राहकाने ‘लोकमत’कडे याबाबत कैफियत मांडली. कॉसमॉस बँंकेच्या व्यवस्थापकांनी चलन संपल्यामळे वितरण बंद केल्याचे मान्य केले. तर सिंडीकेट बँक व्यवस्थापनाने स्टेट बँकेकडे पैशाचे मागणी केली. ४.३० पर्यंत कॅश मिळाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उमरसरा स्टेट बँकेने आपले कामकाज लवकरच आटोपते घेतले. त्यामुळे काही ग्राहकांनी ‘लोकमत’ कार्यालयाकडे संपर्क साधला.

वीज कंपनी स्वीकारणार ५०० च्या नोटा
वीज वितरण कंपनीने वीज बिल भरताना ५०० च्या नोटा स्वीकारण्यास प्रथम नकार दिला होता. मात्र आता ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येईल. तसेच वीज बिलाची मुदत वाढवून देण्यात येईल.

२०० कोटींच्या चिल्लर नोटा द्या
३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मंगळवारी रात्री या निर्णयाची घोषणा झाली. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. बुधवारी बँका बंद होत्या. गुरूवारपासून बँकांचे नियमित कामकाज सुरू झाले. व्यवहारात असलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलून त्या चलनात आनण्यासाठी गुरूवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. चलन बदलविणे, पैसे डिपॉझिट करणे, खात्यातून पैसे काढणे या कामांसाठी चिल्लर नोटांची मागणी झाली. एकाच वेळी उसळलेल्या गर्दीने बँकांपुढे पहाटेपासूनच रांगा लागल्या. जिल्ह्यातील चिल्लर नोटांची मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री तातडीची बैठक घेतली. कामकाजाच्या सूचना दिल्या. २०० कोटी रूपयांच्या चिल्लर नोटांची मागणी रिझर्व बँकेकडे नोंदविण्यात आली. या नोटा मिळविण्यासाठी बँकांचे कर्मचारी रवाना झाले. मात्र गुरूवारी उशिरापर्यंत नोटा मिळाल्या नाही. शुक्रवारी बँकांमध्ये चिल्लर नोटा पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
 

Web Title: 200 crore for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.