भांडेगावच्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: November 5, 2015 02:56 IST2015-11-05T02:56:52+5:302015-11-05T02:56:52+5:30
एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथील दोन तरुणांना दारव्हा

भांडेगावच्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी
दारव्हा : एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथील दोन तरुणांना दारव्हा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि अडीच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
रोहिदास माणिक चव्हाण (२०) व प्रवीण पुंडलिक राठोड (२५) दोघेही रा. भांडेगाव अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ८ आॅक्टोबर २०१४ रोजी १४ वर्षीय मुलगी आरोपी रोहिदास चव्हाण यांच्या आॅटोरिक्षात बसून घरी जात होती.
त्यावेळी रोहिदासने शेतात नेऊन अतिप्रसंग केला तसेच त्याच्यासोबत असलेला प्रवीण राठोड यानेही या मुलीवर अतिप्रसंग केला. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. ठाणेदार सदानंद मानकर यांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध करून प्रकरण दारव्हा न्यायालयात दाखल केले.
सत्र न्यायालयाने पीडित मुलगी, तिच्या वडिलांची साक्ष आणि आरोपीच्या वैद्यकीय अहवालावरून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. के.व्ही. सेदानी यांनी दोघांनाही २० वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड़ अमोल राठोड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)