शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्याने घेतला दोन चिमुकल्यांचा जीव, अंगावर खांब कोसळून बहिण-भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 12:59 IST

सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला. 

पुसद (यवतमाळ) : येथे सहा महिन्यांच्या भावाला पाळण्याचा झोका देत असताना अंगावर खांब कोसळून नऊ वर्षीय बहीण जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी झालेला सहा महिन्यांचा चिमुकला उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू पावला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.

प्राची विजय घुक्से (९ वर्षे) आणि तेजस विजय घुक्से (६ महिने) अशी मृत बहीण-भावाची नावे आहे. येथील लक्ष्मीनगरमधील अमित बोरले यांचे शेत विजय कचरू घुक्से यांनी बटईने केले आहे. ते परिवारासह झोपडी वजा घरात शेतातच राहतात. मंगळवारी प्राची आपल्या सहा महिन्यांच्या लहान भावाला झोक्यावर झुलवत होती. त्यावेळी झोक्याची एक दोरी तुटली लोखंडी खांबाला तर दुसरी दोरी सिमेंट खांबाला बांधलेली होती. यात सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला. 

अचानक झालेल्या आवाजाने मुलांची आई बाहेर आली. शेतात जवळच काम करणारे वडील विजयदेखील धावत आले. त्यांनी दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी प्राची मृत झाल्याचे घोषित केले. गंभीर जखमी तेजसला  नांदेड येथे हलविण्याची डॉक्टरांनी केली. त्यानुसार त्याला नांदेडला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, विजय घुक्से यांना तीन मुलींच्या पाठीवर सहा महिन्यांपूर्वीच एकुलता एक मुलगा झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेत दोन्ही लगानग्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने घुक्से परिवारावर आभाळच कोसळले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूYavatmalयवतमाळ