शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारांसाठी १९६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:09 IST

शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देयवतमाळ शहर : दीड महिन्यात कार्यादेश काढण्याची नगरविकासची सूचना

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.केंद्र सरकारने अमृत अभियान हाती घेतले आहे. या अभियानात ज्या शहरांचा समावेश आहे, त्या ठिकाणी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सोबतच भूमिगत गटार, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास या पायाभूत सुविधांचा सहभाग आहे. अमृत योजनेतील २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम यवतमाळात सुरू झाले आहे. यासोबतच भूमिगत गटारनिर्मितीचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळायची होती. आता नगरविकास विभागाने २६ मार्च रोजी यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली. संपूर्ण शहरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १९६ कोटी रुपये लागणार आहे. यातील ५० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे, तर २५ टक्केचा वाटा राज्य शासनाचा राहणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात यवतमाळ नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.या योजनेत केंद्र सरकारचे ९८ कोटी ३८ लाख रुपये, राज्य शासनाचे ४९ कोटी १९ लाख रुपये तर यवतमाळ नगरपरिषदेला ४९ कोटी १९ लाख रुपये निधी उभारावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी चिन्हांकित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे सचिव पां.जो. जाधव यांनी दिली आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यान्वित यंत्रणेवर राहणार आहे. केंद्र सरकार आपल्या वाट्याचा निधी टप्प्याटप्प्यात वळता करणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ४० आणि तिसºया टप्प्यातही ४० टक्के निधी देणार आहे. हे काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.यवतमाळातील रस्त्यांचे पुन्हा खोदकामयवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून विकास कामांसाठी रस्त्यांचे प्रचंड खोदकाम होत आहे. आर्णी मार्गावर चौपदरीकरणासाठी प्रचंड खोदकाम झाले. त्यानंतर बेंबळा जलवाहिनीसाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करण्यात आले. आता भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील रस्ते पुन्हा खोदले जाणार आहे. त्यामुळे यवतमाळकरांना आणखी काही दिवस खडतर प्रवास करावा लागणार आहे.