लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील जोडमोहा रोडवर असलेल्या थाळेगाव पुनर्वसन येथे अनेक कुटुंब २००२ पासून कॅनॉलच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास आहे. आता हे अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे, अशी नोटीस ग्रामपंचायतीने बजावली आहे. मात्र कोरोना महामारीच्या संकटात आहे ते घर मोडून नवीन निवारा शोधणे कठीण आहे. किमान याचा विचार करून अतिक्रमण काढण्यासाठी सवड द्यावी, अतिक्रमणधारकांना बेघर करू नये, असे साकडे येथील कुटुंबांनी घातले आहे.थाळेगाव पुनर्वसन येथे दत्तापूर कॅनॉलच्या जागेत अतिक्रमण करून काही कुटुंबांनी निवारा उभारला आहे. १८ वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्याला आहे. आतापर्यंत त्यांना कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा अतिक्रमण झाल्याबाबत अवगत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कुटुंबांनी येथेच राहून आपला रोजगार व मुलांच्या शिक्षणासाठी घरे उभारली आहे. अचानक या कुटुंबांना थाळेगाव ग्रामपंचायतीने तात्काळ जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. कोरोना महामारीच्या संकटाने सर्वत्र लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. रोजमजुरी करून जगणाऱ्या या कुटुंबांपुढे अशीच आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या या संकटात ग्रामपंचायतीने नोटीस बजावून भर घातली आहे. केलेले अतिक्रमण खाली करण्यासाठी सध्याच कारवाई करू नये, दिलासा दिला जावा. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अतिक्रमण असलेल्या नागरिकांनी कळंब तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी विनायक भोंगाडे, संजय भोंगाडे, किसन दुपारे, राजेश कराळे, साधना दिघाडे आदी उपस्थित होते.
कॅनॉलच्या जागेवर १८ वर्षे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST
थाळेगाव पुनर्वसन येथे दत्तापूर कॅनॉलच्या जागेत अतिक्रमण करून काही कुटुंबांनी निवारा उभारला आहे. १८ वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्याला आहे. आतापर्यंत त्यांना कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा अतिक्रमण झाल्याबाबत अवगत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कुटुंबांनी येथेच राहून आपला रोजगार व मुलांच्या शिक्षणासाठी घरे उभारली आहे. अचानक या कुटुंबांना थाळेगाव ग्रामपंचायतीने तात्काळ जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
कॅनॉलच्या जागेवर १८ वर्षे अतिक्रमण
ठळक मुद्देग्रामपंचायतीची नोटीस : बेघर न करण्यासाठी कळंब तहसीलदारांना साकडे