शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:01 IST

कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली.

यवतमाळ - जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी, गुलाबी बोडअळी, मलिबगचे प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यांसारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. या मृत्यू पडलेल्या शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपूर्ण खर्च देणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्च समितीच्या अहवालाच्या नावावर मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा प्रकार आपण हाणून पाडणार असून, या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव, कळंब, मारेगाव, केळापूर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसांत दौरे करून माहिती जुळवल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ७५० रुग्णांमध्ये आदिवासी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समावेश असून, आतापर्यंत 17पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये कीटकनाशकाची बाधा झालेले निरपराध जीव गमावले असून, यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे, आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण, कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर, कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार, उचेगाव गावचे रवी राठोड, पहापळचे विठ्ठलराव पेरकेवार टेंभीचे विलासभाऊ मडावी, मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव मारोतराव पिंपळकर, घोडधरा गावांतील दिवाकर घोसी, टाकळी गावचे शंकर कदम, मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले, राळेगावचे सावरगावचे गजाननराव फुलमाळी यांचा समावेश असून, जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपा काढत असल्यास या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.