कत्तलीसाठी जाणाऱ्या १८ बैैलांची सुटका
By Admin | Updated: March 5, 2017 01:07 IST2017-03-05T01:07:16+5:302017-03-05T01:07:16+5:30
एका १२ चाकी ट्रकमध्ये १८ जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना वरोरा टी-पॉर्इंटजवळ पोलिसांनी ट्रकसह तीन तस्कराला ताब्यात घेतले.

कत्तलीसाठी जाणाऱ्या १८ बैैलांची सुटका
तिघांना अटक : जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ९ लाख ८० हजार रुपये
वणी : एका १२ चाकी ट्रकमध्ये १८ जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना वरोरा टी-पॉर्इंटजवळ पोलिसांनी ट्रकसह तीन तस्कराला ताब्यात घेतले. ट्रक व जनावरांसह पोलिसांनी नऊ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
सुखवंदसिंग गजनसिंग बाजवा (४९) रा.गुरूतेजबहादूरनगर नागपूर, शेख निसार शेख शब्बीर (३५) रा.कळंब जि.यवतमाळ व अश्विनकुमार रामदास सैैनी (५२) रा.बुटीबोरी नागपूर असे अटकेतील तस्करांची नावे आहे. ट्रक क्रमांक एम.एच.४०-ए.के.५९४५ मध्ये १८ बैैलांना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. याबाबत ठाणेदार मुकुंद कुळकर्णी व डी.बी. पथकाला कुणकुण लागताच त्यांनी वरोरा टी-पॉर्इंजटजवळ नाकाबंदी केली. तेथे हा ट्रक पोहोचताच या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये १८ बैैलांना दोरीच्या साह्याने बांधून असल्याचे आढळून आले. या जनावरांना तेलंगणामध्ये कत्तलीसाठी नेत असल्याचीही या तस्करांनी कबुली दिली. या बैलांची किंमत एक लाख ८० हजार रूपये असून ट्रकची किंमत आठ लाख रूपये आहे. पोलिसांनी एकूण नऊ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांविरूद्ध कलम ११ प्राणीमात्रांना निर्दयतेने वागणूक देणे प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रूपेश पाली, प्रकाश गोरलेवार, दिलीप जाधव, नितीन सलाम, प्रशांत आडे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)