मंदरजवळ अपघातात १७ भाविक जखमी
By Admin | Updated: April 4, 2015 23:54 IST2015-04-04T23:54:55+5:302015-04-04T23:54:55+5:30
चंद्रपूर येथून महाकालीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकाच्या जीपला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात १७ भाविक जखमी झाले.

मंदरजवळ अपघातात १७ भाविक जखमी
ट्रकची जीपला धडक : दोन जण गंभीर
वणी : चंद्रपूर येथून महाकालीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकाच्या जीपला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात १७ भाविक जखमी झाले. ही घटना वणीनजीकच्या मंदरजवळ शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर वणीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील भाविक चंद्रपूरला महाकाली दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते एम.एच.२६-बी-६९४२ या जीपने परतीच्या प्रवासावर होते. वणीपासून काही अंतरावर या जीपला मंदरजवळ ट्रक एम.एच.४२-बी-७५९१ ने जबर धडक दिली. यात गंगाधर शेंडे (२५), सुलोचना नाईक (२७), मंगल हक्के (२७) सर्व रा.नांदेड हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले.
या अपघातात भाविकांच्या वाहनातील अर्चना चौधरी (२६), बुश बोचक्के (६१), बालाजी सोनटक्के (१८), चवंताबाई हाकी (४०), सावित्री अशके (६०), संदीप आमुगे (३९), पद्मीनी पथाडे, मरिबा लोणे (६५), सावित्रीबाई आमुगे (३४), भीमराव मास्तर (४०), केशबाई सुताळे (५०), संदुबाई आकरे (५५), नागोराव देवकरे (६०), सावित्रीबाई आस्के (५०) सर्व रा.नांदेड हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बालाजी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला. ट्रक चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अस्लम खान यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (प्रतिनिधी)