दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By Admin | Updated: February 22, 2015 02:04 IST2015-02-22T02:04:45+5:302015-02-22T02:04:45+5:30

सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

17 farmers suicides in Darwha taluka | दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

दारव्हा तालुक्यात १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

दारव्हा : सततची नापीकी, कर्जबाजारीपणा यासह अन्य कारणामुळे दारव्हा तालुक्यात गेल्या वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये दोन महिलेसह एका युवतीचासुद्धा समावेश आहे.
तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येची प्रकरणे तालका, जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने त्यामधील केवळ चारच आत्महत्या पात्र ठरविल्या. त्यामुळे पात्र ठरलेल्या कुटुंबांनाच शासनाची मदत मिळाली.
जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी आहे. त्यामध्ये प्रल्हाद जगराम जाधव हनुमान नगर, संतोष अरुण दुरटकर, मांगकिन्ही, सचिव प्रदीप मलमकर लोही, जमनाबाई शिवासुळ किन्ही वळगी, धनेश्वर नामदेव ढेंबे दारव्हा, संतोष प्रभाकर अलोणे सायखेड, लखन महादेव डोंगरे महतोली, शेषराव डोमाजी जाधव चानी, प्रल्हाद झिता राठोड लाखखिंड, सुभाष पुंडलिक धुरट घनापूर, अशोक मणजी पवार पळशी, सदाशिव बाबू पावडे डोल्हारी, पुंडलिक केशव रामगडे चिचबर्डी, मनकर्णा काशीराम ठोंबरे गणेशपूर, तुकाराम बाबूलाल चव्हाण भोपापूर, पुनाजी रोडबाजी मनवर मांगकिन्ही, सीमा राजाभाऊ देशमुख धामणगाव आदींचा समावेश आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपयाची मदत दिल्या जाते. परंतु त्याकरिता काही निकष आहे. पात्र आत्महत्या निवडीकरिता तालुका व जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीच्या छाननीत वरील चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या. उर्वरित १३ आत्महत्या अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा लाभ मिळाला नाही.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 17 farmers suicides in Darwha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.