शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal | पंधरा वर्षाच्या बालकाचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: October 14, 2022 14:01 IST

गुरुवारी रात्रीची घटना: मारहाण करून बसविले दुचाकीवर

यवतमाळ : शहरातील तारपुरा परिसरात राहणारा बालक घराजवळच्या मुलींसोबत टिफीन पोहोचविण्यासाठी दुचाकीवर बसून गेला. त्यानंतर कॉटन मार्केट चौक परिसरात आरोपीने त्या बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसविले. त्याला नारंगी नगर परिसरातील मैदानात नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली. या घटनेची माहिती मुलींनी पालकांना दिली, त्यानंतर सदर बालकाची शोधाशोध सुरू झाली. 

समीर इसराइल शेख (वय 23 रा. परदेशी पुऱ्यामागे तारापुरा यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. पीडित बालक नेहमीच शेजारी राहणाऱ्या मुलींसोबत टिफिन वाटप करण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे तो गुरुवारीसुद्धा ताईंसोबत दुचाकीवर बसून टिफिन वाटपासाठी गेला. दरम्यान, धामणगाव मार्गावरील जाजू कॉलेज जवळ त्याचे अपहरण करून आरोपी समीरने त्याला नारंगी नगर परिसरातील मैदानावर नेले. या घटनेनंतर तत्काळ दोन्ही मुलींनी बालकाचे अपहरण झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली, कुटुंबीयांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले घटनेची माहिती ठाणेदारांना देण्यात आली.

या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ शोध घेणे सुरू केले. रात्री दीड वाजताच्या दरम्यान आरोपी समीर इस्राईल शेख हा हाती लागला. तर पीडित बालक घटनेनंतर तलावफल मार्गे पायदळ घराकडे निघाला, त्याने पालकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ही घटना वेळेत उघडकीस आल्याने व आरोपीला अटक झाल्यामुळे मोठा तणाव निवळला. धार्मिक व जातीय तणाव निर्माण होण्याचा धोका होता. पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तसेच बाल लैगिंक  कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आरोपीच्या अटकेची कारवाई शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाने केली. घटनेनंतर अवघ्या तीन तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणYavatmalयवतमाळ