गोदामातून दीड लाखांचे सोयाबीन लंपास
By Admin | Updated: February 7, 2015 01:34 IST2015-02-07T01:34:26+5:302015-02-07T01:34:26+5:30
येथील यवतमाळ मार्गावरील केएम प्रकल्पाचे गोदाम फोडून दीड लाख रुपये किंमतीचे ५३ क्ंिवटल सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

गोदामातून दीड लाखांचे सोयाबीन लंपास
नेर : येथील यवतमाळ मार्गावरील केएम प्रकल्पाचे गोदाम फोडून दीड लाख रुपये किंमतीचे ५३ क्ंिवटल सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणात यवतमाळातून एका महिलेला अटक करून तिच्याजवळून २७ क्ंिवटल सोयाबीन जप्त केले.
नेर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर केएम प्रकल्पांतर्गत एडीएम (आयशर डॅनियल मिरलॅन्ड कंपनी) अकोला या कंपनीचे गोदाम आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सोयाबीन या गोदामात ठेवले जाते. चोरटे गुरुवारी रात्री दोन वाहनांसह गोदामानजीकच्या शेतात पोहोचले. जवळच असलेल्या गोदामाचे शटर सबलीच्या सहाय्याने तोडले. चोरट्यांनी या गोदामातील ५३ क्ंिवटल सोयाबीन लंपास केले. सदर प्रकार सकाळी उघडकीस आला. मात्र या घटनेची तक्रार दुपारी २ वाजताच्या सुमारास नेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी केली. यावेळी फाटलेल्या पोत्यातून सांडलेले सोयाबीन आणि टायरच्या खुणांवरून मार्ग काढत पोलिसांनी यवतमाळ बाजार समिती गाठली. त्या ठिकाणी चोरीचा माल विकत असताना मीरा अशोक पवार (३५) या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याजवळून २७ क्ंिवटल सोयाबीनही जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे तक्रारीत नोंदविलेल्या सोयाबीन पोत्यात तफावत आढळून आल्याने यात पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)