केरळ आपत्तीग्रस्तांना दीड लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:03 IST2018-09-06T22:03:09+5:302018-09-06T22:03:45+5:30
नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे. केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले.

केरळ आपत्तीग्रस्तांना दीड लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे.
केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले. १४ पैकी १० जिल्हे उध्वस्त होऊन प्रचंड नुकसान झाले. तेथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केरळ राज्य सरकारने देशवासीयांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दारव्हा येथे आपदा समिती स्थापन करण्यात आली. प्रथम या समितीतर्फे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्या मध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली.
यानंतर समितीचे कार्यकर्ते, नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींनी प्रत्यक्ष मदत गोळा करण्याकरिता शहरातून रॅली काढली. यातून दीड लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम ‘सीएमो केरला रिलीफ फंड’मध्ये जमा करण्यात आली.
निधी गोळा करण्याकरिता आपदा समितीचे डॉ.वसी, अॅड.राजेश जाधव, डॉ.मनोज राठोड, डॉ.विनोद कदम, प्रा.राजेंद्र ठाकूर, श्याम पांडे, संजय बिहाडे, गणेश भोयर, भैरव भेंडे, समाधान आडे, मेजर सोनोने, असलमभाई, गजमफर मिर्झा आदींनी परिश्रम घेतले.