दीड कोटींचा निधी

By Admin | Updated: April 30, 2015 00:07 IST2015-04-30T00:07:03+5:302015-04-30T00:07:03+5:30

नगरोत्थान योजनेचा तब्बल दीड कोटींचा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाल्याने आता शहरात विविध विकास कामांना गती मिळण्याची शक्यता बळावली आहे.

1.5 crore fund | दीड कोटींचा निधी

दीड कोटींचा निधी

नगरोत्थान योजना : शहरात विकास कामे
वणी : नगरोत्थान योजनेचा तब्बल दीड कोटींचा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाल्याने आता शहरात विविध विकास कामांना गती मिळण्याची शक्यता बळावली आहे.
नगरोत्थान योजनेंतर्गत आत्तापर्यंत केवळ ७५ लाखांचाच निधी नगरपरिषदेला प्राप्त होत होता. मात्र मनसेने सत्ता प्राप्त करताच हा निधी वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न केले. नगराध्यक्षांसह मनसेचे गटनेते धनंजय त्रिंबके आणि सर्व नगरसेवकांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. परिणामी आता हा निधी वाढून दीड कोटींवर गेला आहे. या दीड कोटींच्या निधीतून आता विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात शहरात काँक्रीट रस्ते, भूमिगत गटारे, डांबरे रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकत्याच निविदाही काढण्यात आल्या आहेत.
सध्या शहरातील प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, पाचमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. काही ठिकाणी रस्ते तयार करण्यात येत आहे, काही प्रभागात भूमिगत गटारे होत आहे. आता नगरात्थोन योजनेशिवाय पूरहानी, दलित वस्ती सुधार योजना, आमदार निधी, तेरावा वित्त आयोग, नैसर्गिक आपत्ती, नगरपरिषद सर्वसाधारण निधीतून विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या असून लकवरच वर्क आॅर्डर होण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

१० कोटींची गरज
शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला सुमारे १० कोटी रूपयांची गरज आहे. त्याबाबत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारित करण्यात आला होता. हा प्रस्ताव आता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Web Title: 1.5 crore fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.