शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात यवतमाळातील १४५ बालिकांवर अत्याचार; ४६ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:26 IST

कायद्याचा धाक कागदावरच : हैवानांना रोखणार कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण अंगावर शहारे आणणारे आहे. हैवानांनी अल्पवयीन मुलींनाच वासनेची शिकार बनविले आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत १४५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणातून ४६ अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या आहेत. हा किळसवाणा प्रकार वाढत असून कठोर कायदा केल्यानंतरही गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. हैवानांना रोखणार कसे, असा प्रश्न आहे.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येतो. त्यानंतरही या गुन्ह्यांवर कुठलेच नियंत्रण नसल्याचे सात महिन्यातील आकडेवारीतून दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावर मातृत्व लादले जात आहे. अनेक घटना या मुलगी गर्भवती राहिल्यानंतरच पुढे येतात. तर काही प्रकरणात मुलींना फूस लावून पळवून नेले जाते.

मुर्तीचे असाहाय्य आई-वडील पोलिसांवरच पूर्णतः अवलंबून असतात. पोलिस तपासात मुलींचा शोध घेतला जातो, आरोपीला अटक केली जाते, यावरच ही समस्या थांबत नाही.

अवैध मार्गाने गर्भपात

  • अल्पवयीन मुलगी गर्भवती आहे. हे कुटुंबात माहीत झाल्यानंतर तिला दोषी धरून बदनामीच्या भीतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. मुलींचा अवैध मार्गाने गर्भपात करण्याचा खटाटोप केला जातो. बुवाबाजी करणारे, बोगस डॉक्टर तसेच बाजारात मिळणारी गर्भपाताची औषधी यांचा वापर केला जातो. मात्र या मार्गामुळे अनेकदा मुलीच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतो.
  • ही अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनलेली असते. तिच्या पोटातील बाळ ही कुणाची जबाबदारी, हा प्रश्न निर्माण होतो. त्यात समाजातून टीकेची झोड उठते. पीडित मुलगी व तिच्या माता-पित्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी पदोपदी तिस्काराचा अनुभव येतो. जिल्ह्यात पूर्वी एका भागापुरते मर्यादित असणारी कुमारी मातांची समस्या आता भीषण बनली आहे. 

मुलींमधील शारीरिक बदलाची कारणेमानसिकदृष्ट्या तसेच वयाने मुली अल्पवयीन असल्या तरी त्यांचा शारीरिक विकास लवकर होतो. यासाठी फास्ट फूड, खाद्य पदार्थातील अजिनामोटो, हार्मोनयुक्त दूध यामुळे एक आकर्षण निर्माण होते. सोबतच मोबाईलमधून पसरणारी अश्लीलता, दिशाभूल करणारी असल्याने अल्पवयीन मुली बळी पडत आहेत.

अल्पवयीन मुलींवर गर्भपाताची वेळकाही समजण्याच्या पूर्वीच मातृत्व लादल्याने ४५ मुली गर्भवती राहिल्या. त्यापैकी ३२ मुलींचा बाल कल्याण समितीच्या परवानगीने गर्भपात करण्यात आला. तर १४ मुलींची प्रसूती करण्यात आली. त्यांना झालेले बाळ समर्पण करून संस्थेकडे देण्यात आले. ही सर्व प्रक्रिया बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसारच झाली आहे.

पळविलेल्या मुली सापडतात पुण्यातफूस लावून पळविण्यात आलेल्या मुली साधारणपणे पुणे व त्या परिसरात आढळतात. बहुतांश प्रकरणात पोलिस तपासून हे उघड झाले आहे. आरोपी रोजगाराच्या शोधात अल्पवयीन मुलींना पुण्यात घेऊन जातो. त्या गर्दीमध्ये आपला कोणी शोध घेणार नाही, अशी आरोपीची मानसिकता असते. अल्पवयीन मुलगी सोबत असताना आरोपींना तेथे आश्रय कसा मिळतो, खोली व इतर संसाधने कशी उपलब्ध करून दिली जातात, याचा तपास करून कारवाई होत नसल्याने हा प्रकार वाढत असल्याचेही दिसते.

"बालकांचे रक्षण केवळ शासनाची जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे. बालिकांवरील अत्याचाराचे आकडे हे फक्त रेकॉर्डवर आले आहे. यापेक्षा अधिक भयंकर वास्तव दडलेले असू शकते. त्यामुळे सर्वांगीण प्रयत्न करूनच हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे."- अनिल गायकवाड, सदस्य बाल कल्याण समिती, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ