पांढरकवड्याच्या विकासासाठी १४ कोटी
By Admin | Updated: February 29, 2016 01:59 IST2016-02-29T01:59:12+5:302016-02-29T01:59:12+5:30
शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामासाठी तब्बल १३ कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

पांढरकवड्याच्या विकासासाठी १४ कोटी
पांढरकवडा : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामासाठी तब्बल १३ कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या कामाचे केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी भूमिपूजन केले.
केंद्र सरकार विकासाच्या दृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देत असून शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, पुनर्वसीतांचे हित या योजनांमधून जोपासले जात आहे. शासन शेतकरी हिताचे तसेच मोठी शहरे, गावांचा विकास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर शासनाने हाती घेतले असून विकासासाठी कोट्यावधींचा निधी या भागात उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते येथील चिंतामणी नगरमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा.राजू तोडसाम, जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, भाजप नेते शिवारेड्डी येल्टीवार, संतोष चिंतावार, अरूण देऊळकर, शंकर सामृतवार, बशिर, मंंगेश वारेकर, प्रा.अजय दुबे, चंदू फुलाडीया उपस्थित होते. येत्या दोन दिवसात तालुक्यातील मारेगाव (वन), वाघोली, केगाव, नागेझरी, झुली, बोथ, टेंभी, सोनबर्डी व अनेक गावांमध्ये एकूण १३ कोटी ७२ लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.
संचालन किशोर घाटोळ यांनी केले. यावेळी रमेश उग्गेवार, नामदेव पंडित, वासुदेव बोकीलवार, स्वप्नील मंगळे, बंटी जुवारे, अभय डोंगरे, मनोहर कोटनाके, विलास जुमनाके, पंकज राठोड, जीवन चव्हाण, तुळशीराम कुळमेथे यासह नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)