यवतमाळात १४ कोटींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:31+5:30

नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने डांबरी रस्ते, मोठ्या नाल्यांना स्टेनिंग वॉल, काँक्रिट रस्ते याचा समावेश आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून सहा कोटी आठ लाख १७ हजार ५६ रुपयांची २२ कामे हाती घेण्यात आली आहे.

14 crore development works in Yavatmal | यवतमाळात १४ कोटींची विकास कामे

यवतमाळात १४ कोटींची विकास कामे

ठळक मुद्देपावसाळ्याचा मुहूर्त : नगरोत्थान व नागरी दलित वस्ती सुधार योजना, डांबरीकरणावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेने शहरात एकाच वेळी १३ कोटी ९६ लाख आठ हजार ५६ रुपयांची कामे सुरू होत आहेत. नगरपरिषदेला नगरोत्थान महाअभियान व नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पालिकेकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील योजनेचा निधी अखर्चित होता. त्यातील कामांना आता सुरुवात होत आहे.
नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने डांबरी रस्ते, मोठ्या नाल्यांना स्टेनिंग वॉल, काँक्रिट रस्ते याचा समावेश आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून सहा कोटी आठ लाख १७ हजार ५६ रुपयांची २२ कामे हाती घेण्यात आली आहे. यामधूनही डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व सिमेंट काँक्रीट रस्ते याचा समावेश आहे. नगरपरिषदेने याला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून २२ व नगरोत्थानमधून २७ अशा ४९ कामांना एकाच वेळी सुरुवात होत आहे. यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते, नाल्या ही कामे होणार आहेत.
नगरपरिषदेचे अभियंता विनायक देशमुख यांच्या स्तरावर कामांचे नियोजन केले जात आहे. आतापर्यंत प्रक्रियेत रखडलेली कामे पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता
शहरात यापूर्वी वाढीव भागातील रस्ते व इतर विकास कामांकरिता १४ कोटींचा निधी विशेष परिश्रमाने आणला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कामे अतिशय घाईघाईत उरकण्यात आली. कधी नव्हे वाढीव क्षेत्रातील भागात डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र घाईगडबडीत याची गुणवत्ता राखल्या गेली नाही. आता हे रस्ते उखडले आहेत. होऊ घातलेल्या कामांची गुणवत्ता राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: 14 crore development works in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.