रेशनचा १२७ कट्टे तांदूळ जप्त
By Admin | Updated: May 22, 2015 00:10 IST2015-05-22T00:10:46+5:302015-05-22T00:10:46+5:30
स्वस्त धान्य परवानाधारकांकडूनच गरिबांच्या तांदूळांची काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

रेशनचा १२७ कट्टे तांदूळ जप्त
रॅकेट जाळ्यात : परवानाधारकांचाच समावेश
यवतमाळ : स्वस्त धान्य परवानाधारकांकडूनच गरिबांच्या तांदूळांची काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. भोसा येथून पोलिसांनी तीन परवानाधारकांसह एकाला ताब्यात घेतले. बुधवारी रात्री केलेल्या या कारवाईत १२७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आले.
शासकीय गोदामातून राजू गिरोलकर रा. चापमनवाडी या परवाधारकांकडून १५ क्ंिवटल तांदूळाची उचल केली. यातील काही तांदूळ स्वत:च्या दुकानात ठेऊन उर्वरित तांदूळ तायडेनगरातील परवानाधारक शकील अहमद अब्दूल रशीद याला विकला. त्याने हा तांदूळ शमशुद्दीन अमिनोद्दीन सोळंकी रा. रा. टिपू सुल्तान चौक भोसा या विकले. या संपूर्ण व्यवहारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाची नजर होती. टाटाएस क्र. एम.एच.२९-टी-६२०१ यातून परस्पर हलविण्यात आला. ८२ हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी भोसा येथील शमशुद्दीन याच्याकडून ताब्यात घेतला. परवानाधारकांसह चालक असीरु खान नफूर रा. इंदिरानगर याच्यावर जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, संजय दुबे, सचिन हुमणे, आशिष चौबे, साजीद खान, सलीम पठाण यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)