१२६ कवींचे काव्याभिवादन
By Admin | Updated: April 9, 2017 00:48 IST2017-04-09T00:48:28+5:302017-04-09T00:48:28+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ नगरपरिषद ..

१२६ कवींचे काव्याभिवादन
नगर भवनात आयोजन : नगरपरिषद, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी
यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ नगरपरिषद आणि आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने येथे महाकविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी येथील नगरभवनात महाराष्ट्रातील नामवंत १२६ कवी यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्घाटन नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते होईल. आंबेडकरी साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे अध्यक्षस्थानी राहतील.
तीन सत्रात कविसंमेलन होईल. दुपारी १२ वाजता उद्घाटन सत्रासोबतच प्रथम सत्र सुरू होणार आहे. दुपारी ४ ते ७ तथा ७ ते १० असे अनुक्रमे द्वितीय व तृतीय सत्र राहील. द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. शीतल मडावी, तर तृतीय सत्राला प्रा.डॉ. गणेश टाले हे अध्यक्ष राहतील. तीनही सत्राचे संचालन प्रा.डॉ. अजय खडसे, चंद्रबोधी घायवटे, सज्जन बरडे, मृणालिनी दहिकर, सुनील वासनिक, प्रा. श्रद्धा धवने, प्रशांत वंजारे करतील.
या महाकविसंमेलनात डॉ. नूरजहां पठाण, मांगीलाल राठोड, एजाज खान एजाज, रवींद्र साळवे, गजानन पालवे, मुन्नाभाई नंदागवळी, सुरेश साबळे, शालिक जिल्हेकर, हृदय चक्रधर, संजय घरडे, शेषराव धांडे, मोहन शिरसाठ, अनिल कांबळे, महेंद्र ताजने, प्रा. विलास भवरे, रानील कांबळे, सुदाम सोनुले, शरद थोरात, बी.टी. धांडे, सरिता रामटेके, आकांक्षा अळणे, कांचन वीर, विजया मारोतकर, जयश्री रामटेके, अविनाश गोंडाने, नागेश वाहुरवाघ, जगदीश राऊत, बुद्धघोष लोणारे, जयंत साठे, भूषण रामटेके, वैशाली कोल्हे, शशी थूल, संजय पाटील, विजय काळे, प्रा. महेश हंबर्डे आदी १२६ नामवंत कवी सहभागी होतील.
या काव्याभिवादन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे गोपीचंद कांबळे, आनंद गायकवाड, बळी खैरे, कवडू नगराळे, सुनील भेले, सतीश राणा, भास्कर चव्हाण, सुनील वासनिक, संजय मानकर, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, प्रा. संदीप नगराळे, सुमेध ठमके, प्रा. युवराज मानकर, संजय ढोले, आनंद डोंगरे आदींनी केले आहे. (वार्ताहर)