लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील मालमत्ताधारकांकडे थकीत असलेला १७ कोटींचा कर वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. एक लाखांपेक्षा अधिक कर थकीत असलेल्या ४०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपूर्वी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची नगर परिषदेची धावाधाव सुरु झाली आहे.
यवतमाळ शहरात एकूण एक लाख १६ हजार १५५ मालमत्ताधारक आहे. यात घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नगर परिषदेने २६ कोटींचा कर निश्चित करून ३१ मार्चपूर्वी वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ११ कोटींचा कर वसूल झाला आहे. त्यामुळे अजूनही १५ कोटींचा कर वकीत आहे. कर स्कमेची थकबाकी पाहता उद्दिष्टापैकी ५० टक्केही वसुली झाली नसल्याचे दिसत आहे. दहा महिन्यांत वसुलीबाबत बिनधास्त असलेले प्रशासन ३१ मार्चला अवघे दोन ते अडीच महिने शिल्लक असल्याने अॅक्टिव्ह झाले आहे. थकीत मालमत्ताधारकांची 'कुंडली' काढण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक कर थकीत असलेले मालमत्ताधारक रडारवर घेण्यात आले आहेत. तब्बल ४०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावून ३१ मार्चपूर्वी थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा कारवाई करू, असा दम नगर परिषदेने दिला आहे.
कर न भरणाऱ्यांवर होणार जप्तीची कारवाई
- मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर विशेष लक्ष केटित करण्यात आले आहे. थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी नगर परिषदेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याबाबत सूचना केली जात आहे.
- नगर परिषदेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर मानले जाते. मालमत्ता करातून मिळणाऱ्या स्कमेतूनच नगर परिषद प्रशासन शहरातील नागरिकांना सुविधा पुरविते. २५ व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र शासनाने रोखून धरला आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच मालमत्ता कराची वसुलीही मोठ्या प्रमाणात थकीत आहे. अशा वेळी शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
"नगर परिषदेकडून धकीत मालमत्ता कराची वसुली करण्यात येत आहे. ४०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली. कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांना चॉरंट बजावून प्रसंगी जप्तीची कारवाई करण्यात येईल." - हरीश जाधव, कर अधीक्षक, नगर परिषद, यवतमाळ