शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील ११९३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:59 IST

Yavatmal : एकाच कुटुंबातील दोघांच्या लाभावर आली बंधने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. मात्र, या योजनेत एका कुटुंबातील एका शेतकऱ्यांना ही मदत देण्याच्या सूचना आहेत. यानंतरही एकाच कुटुंबातून अनेक लाभार्थी मदतीसाठी असल्याने यावर मात करण्यासाठी रेशनकार्डचा आधार घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ११९३ लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभातून बाद करण्यात आले.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेत दोन लाख ९१ हजार ३७७ पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा करण्यात आला. तत्पूर्वी योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना केंद्र शासनाकडून दिल्या होत्या. त्यानुसार यादीची वरिष्ठ पातळीवर छाननी झाली. यातून एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्यांची नावे बाद करण्यात आली.

छोट्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही काही श्रीमंत शेतकऱ्यांची नावे या योजनेमध्ये दाखल झाली आहेत. आता अशा शेतकऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी विविध माध्यमातून तपासणी होत आहे. 

मदत मिळणाऱ्या ७९८ शेतकऱ्यांकडे शेतीच नाही

या योजनेत मदत देताना त्याकडे शेती असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील ७९८ खातेधारकांकडे शेती नसल्याची बाब पुढे आली आहे. यासाठी या शेतकऱ्यांना शेती असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. अन्यथा मदतीची रक्कम थांबणार आहे. यासाठी तांत्रिक अडचण कारणीभूत ठरली आहे. काही ठिकाणी शेती विकल्यानेही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.

५,०५६ शेतकऱ्यांनी ई केवायसी केलीच नाही

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम गोळा करताना ही रक्कम थेट खात्यात जमा करण्याच्या सूचना आहेत. यासाठी आधार कार्डला बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यासाठी ई केवायसीची प्रक्रिया अत्यावश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील पाच हजार ५६ शेतकऱ्यांनी ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्णच केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालीच नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal: 1193 Farmers Removed from PM Kisan Yojana List

Web Summary : Yavatmal district removed 1193 farmers from PM Kisan Yojana due to 'one family, one beneficiary' rule. Discrepancies arose when ration cards revealed multiple family members receiving aid. Many beneficiaries also lack farmland or completed e-KYC, impacting payments.
टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाYavatmalयवतमाळ