लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आचारसंहितेच्या काळात एका वाहनातून १० लाख ८० हजार रूपयांची रोकड अवैधपणे नेत असताना ती तालुक्यातील आबई फाट्याजवळ पकडली. ही कारवाई शनिवारी रात्री शिरपूर पोलिसांनी केली.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. उमेदवाराची रसद मतदारापर्यंत पोहोचू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आबई फाट्याजवळ एम.एच.३४-बी.एफ.८०२ क्रमांकाची कार अडविण्यात आली. या कारच्या मागील सिटवर एका पोत्यात संशयीत वस्तू आढळून आली. या पोत्याची झडती घेतली असता, त्यामध्ये १० लाख ८० हजार रूपये आढळून आले.याबाबत चालक आशिष विधाते रा.हेटी व सचिन गिरसावळे रा.कोरपना यांना विचारणा केली असता, ही रक्कम वैभव जिनिंग पारवा, ता.कोरपना येथील असल्याचे सांगितले. तसेच ही रक्कम शनिवारीच स्टेट बँकेतून काढण्यात आल्याचे सांगितले. सदर रक्कमेसोबत मूळ कागदपत्र नसल्याने ही कार शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतली. निवडणूक आयोगाचे भरारी पथक प्रमुख नितीन बांगडे यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच पंचनामा व चित्रीकरण करून रात्री ११ वाजता ही रक्कम मारेगाव ट्रेझरीत जमा केली. याप्रकरणी अधिक तपास निवडणूक आयोग करीत आहे.यंत्रणेची करडी नजरनिवडणूक काळात पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते. या व्यवहारावर आयोगाची करडी नजर आहे. त्यासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे.
आचारसंहिता काळात वणीत ११ लाख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:21 IST
आचारसंहितेच्या काळात एका वाहनातून १० लाख ८० हजार रूपयांची रोकड अवैधपणे नेत असताना ती तालुक्यातील आबई फाट्याजवळ पकडली. ही कारवाई शनिवारी रात्री शिरपूर पोलिसांनी केली.
आचारसंहिता काळात वणीत ११ लाख जप्त
ठळक मुद्देशिरपूर पोलीस : निवडणूक आयोगाला माहिती सादर