११ लाखांच्या सोने चोरीतील १२ ग्रॅम जप्त
By Admin | Updated: October 21, 2016 02:12 IST2016-10-21T02:12:00+5:302016-10-21T02:12:00+5:30
दत्त चौकातील ज्वेलर्समधून ११ लाखांचे सोने चोरीच्या घटनेत वडगाव रोड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली.

११ लाखांच्या सोने चोरीतील १२ ग्रॅम जप्त
आणखी एकाला अटक : सूत्रधार कोठडीत
यवतमाळ : दत्त चौकातील ज्वेलर्समधून ११ लाखांचे सोने चोरीच्या घटनेत वडगाव रोड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १२ ग्रॅम सोने जप्त केले.
रत्नाकर पजगाडे यांच्या ज्वेलर्समधून नोकर विष्णू दुद्दलवार याने ५०० ग्रॅम सोने आणि चार किलो चांदी चोरल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी वडगाव रोड ठाण्याच्या शोध पथकातील सहायक निरीक्षक सारंग मिराशी यांनी विष्णूला अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याने चोरीतील काही माल सुवर्ण कारागीर मुकेश खरवडे, रा. चमेडीयानगर यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुकेशला अटक केली. यातील मुख्य सूत्रधार दुद्दलवार याला आणखी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)