११ दिवसांच्या उपवासांची सांगता
By Admin | Updated: September 3, 2015 02:08 IST2015-09-03T02:08:32+5:302015-09-03T02:08:32+5:30
येथील जैनधर्मीय डुंगरवाल, काठेड, खटोड परिवारातील सदस्यांच्या उपवासाची शनिवारी सांगता करण्यात आली.

११ दिवसांच्या उपवासांची सांगता
वणी : येथील जैनधर्मीय डुंगरवाल, काठेड, खटोड परिवारातील सदस्यांच्या उपवासाची शनिवारी सांगता करण्यात आली.
आचार्य परमपूज्य शिवमुनीजी, प्रभाकंवरजी, किरण सुधाजी, प्राचीश्रीजी व प्रसन्नजीच्या प्रेरणेने नम्रता सुरेश डुंगरवाल यांनी ११, चेतना अमित काठेड यांनी नऊ, राखी रमेश खटोड यांनी नऊ दिवस सतत उपवास केले. जैन धर्मात या उपवासांना महत्त्वाचे मानले जाते. उपवासादरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत केवळ गरम पाणीच प्राशन केले जाते. या सर्वांच्या उपवासाच्या समाप्तीनिमित्त शनिवारी पचखान करण्यात आले. त्यानंतर महावीर भवनात डुंगरवाल परिवारातर्फे गौतम प्रसादी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जैन बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)