डॉक्टरांअभावी १०८ रूग्णवाहिका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:23+5:30

मारेगांव तालुक्यात मार्डी, वेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मारेगाव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव तालुका आदिवासीबहुल तालुका असून ग्रामीण भागातून आदिवासी व प्रस्तुती रूग्ण तसेच सर्वसामान्य रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होतात. बरेचदा यातील बहुतांश रूग्णांना रेफर केले जाते.

108 ambulance closed not present doctor | डॉक्टरांअभावी १०८ रूग्णवाहिका बंद

डॉक्टरांअभावी १०८ रूग्णवाहिका बंद

Next
ठळक मुद्देमारेगाव ग्रामीण रूग्णालय : रुग्णांची हेळसांड, मृत्यू होण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयाची दयनीय अवस्था असून मागील तीन-चार महिन्यांपासून ग्रामीण रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी असलेली १०८ रूग्णवाहिकेवर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही रूग्णवाहिका कुचकामी ठरली आहे.
तालुक्यातील १०५ गावांसाठी हे एकमेव मोठे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या एकमेव रूग्णालयात अनेक समस्या कायम आहे. या गंभीर बाबीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
मारेगांव तालुक्यात मार्डी, वेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मारेगाव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव तालुका आदिवासीबहुल तालुका असून ग्रामीण भागातून आदिवासी व प्रस्तुती रूग्ण तसेच सर्वसामान्य रूग्ण मोठ्या प्रमाणात रूग्णालयात दाखल होतात. बरेचदा यातील बहुतांश रूग्णांना रेफर केले जाते.
अशावेळी १०८ रूग्णवाहिकेचा या रूग्णांना मोठा दिलासा मिळतो. परंतु गेल्या चार महिन्यापासून या रूग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण सांगून ही रूग्णवाहिका उभी आहे. आर्थिक अडचणीमूळे रूग्णांचे नातेवाईक पुढील उपचारासाठी वेळेवर रूग्णांना नेऊ शकत नाही. त्यामुळे रूग्ण दगावल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत.

Web Title: 108 ambulance closed not present doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर