१०३ ग्रामपंचायतीवर कोट्यवधींची खैरात

By Admin | Updated: September 18, 2014 00:08 IST2014-09-18T00:08:04+5:302014-09-18T00:08:04+5:30

एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात

103 gram panchayat kalyasadi khairate | १०३ ग्रामपंचायतीवर कोट्यवधींची खैरात

१०३ ग्रामपंचायतीवर कोट्यवधींची खैरात

नीलेश भगत - यवतमाळ
एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात डावण्यात आल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतींना साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे दोन कोटी सहा लाख रुपयांच्या निधीला तत्वत: मंजुरात देण्यात आली. राजकीय हस्तक्षेपातून हा प्रकार घडल्याची ओरड क्रीडा संस्थांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे.
व्यायामाबद्दल आवड निर्माण व्हावी. त्यातून आरोग्याचे संवर्धन व्हावे, खिलाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, या उदात्त हेतूने शासनाने जिल्हा केंद्रापासून तर गावपातळीपर्यंत व्यायामशाळांची निर्मितीसाठी प्रयत्न चालविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या क्रीडा विभागामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येते. क्रीडा संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी क्रीडा संस्था अनुदानासाठी पात्र असतात. दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव मागविले जातात. मात्र यंदा नव्या क्रीडा धोरणानुसार साहित्य खरेदीसाठी ग्रामपंचायतींनाही निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

Web Title: 103 gram panchayat kalyasadi khairate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.