१० जनावरांची सुटका
By Admin | Updated: January 13, 2017 01:35 IST2017-01-13T01:35:31+5:302017-01-13T01:35:31+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातून निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची बुधवारी रात्री ११ वाजता वणी पोलिसांनी सुटका केली. ही घटना वरोरा टी-पॉर्इंटजवळ घडली.

१० जनावरांची सुटका
वणी : चंद्रपूर जिल्ह्यातून निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची बुधवारी रात्री ११ वाजता वणी पोलिसांनी सुटका केली. ही घटना वरोरा टी-पॉर्इंटजवळ घडली. याप्र्रकरणी पोलिसांनी एक लाख ७० हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले.
वणी शहराजवळून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याबाबत गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक टेंभरे, गुन्हे शाखेचे नायक पोलीस शिपाई सय्यद साजीद, सुधीर पांडे, नितीन सलाम, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, दिलीप जाधव, प्रकाश बोरलेवार यांच्या पथकाने वरोरा टी-पॉर्इंटजवळ सापळा रचला. यादरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक एम.एच.३४-ए.बी.४७९२ ची झडती घेतली असता, वाहनात दोन गायी व आठ कालवड आढळून आले. या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे बांधून नेण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच चालक राजू मधुकर झिलपे (१९) रा.रंगनाथनगर, रामदास संभाजी काळे (२१) रा.सालोरी ता.वरोरा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी वणी पोलिसांनी दोघांविरूद्ध कलम ११ (घ) (ड) (अ) कलम ५ ए.बी., २७९ भादंवि सहकलम २७ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)