मुस्लीम समाज मेळाव्यात १० निकाह

By Admin | Updated: May 19, 2016 02:07 IST2016-05-19T02:07:42+5:302016-05-19T02:07:42+5:30

येथे घेण्यात आलेल्या मुस्लीम समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात १० निकाह पार पडले. सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह सागवान यांच्या पुढाकारात हा मेळावा घेण्यात आला.

10 Nomahs in Muslim Community Meet | मुस्लीम समाज मेळाव्यात १० निकाह

मुस्लीम समाज मेळाव्यात १० निकाह

यवतमाळ : येथे घेण्यात आलेल्या मुस्लीम समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात १० निकाह पार पडले. सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह सागवान यांच्या पुढाकारात हा मेळावा घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद तारीक साहीर लोखंडवाला, सुशील कोठारी आदींची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
मेळाव्यात विवाह झालेल्या जोडप्यांना शासकीय योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. शिवाय संसारोपयोगी साहित्य दिले जाणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. मेळाव्यासाठी मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: 10 Nomahs in Muslim Community Meet