पुसद बीडीओसह १० ग्रामसेवक दोषी

By Admin | Updated: September 8, 2014 01:46 IST2014-09-08T01:46:31+5:302014-09-08T01:46:31+5:30

पुसद पंचायत समितीतील मस्टर घोटाळ्यात तत्कालीन बीडीओसह १० ग्रामसेवकांवर दोष सिध्द झाला आहे.

10 gramsevaks guilty with Pusad BDO | पुसद बीडीओसह १० ग्रामसेवक दोषी

पुसद बीडीओसह १० ग्रामसेवक दोषी

यवतमाळ : पुसद पंचायत समितीतील मस्टर घोटाळ्यात तत्कालीन बीडीओसह १० ग्रामसेवकांवर दोष सिध्द झाला आहे. यात दहीवड आसोलीचे एस.डी. हिंगाडे आणि पार्डी येथील के.बी. सोनटक्के या दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित आठ ग्रामसेवकांसह दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घोटाळ्यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी ही कारवाई केली.
रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची प्रकरणे पुढे येत आहे. पुसद पंचायत समिती अंतर्गत रोहयोचा मस्टर घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता पंचायत समिती स्तरावरून ग्रामसेवकांनी ई-मस्टरचा उपयोग करण्याऐवजी म्यन्यूअल मस्टर वापरले. यासाठी कुठलीही पूर्व परवानगी घेण्यात आली नाही. मस्टरची मुदत संपल्यानंतरही त्याचा वापर केला गेला. त्याला व्हॅलीड करून घेण्यात आले नाही. एका ग्रामपंचायतीसाठी मंजूर असलेले मस्टर दुसऱ्याच ग्रामपंचायतीसाठी वापरण्यात आले. एस.डी. हिंगाळे या ग्रामसचिवाने पंचायत समितीत जाऊन स्वत:च स्टॉक बुकमध्ये मस्टरच्या नोंदी केल्या. यासह अनेक प्रकारची अनियमितता चौकशीत आढळून आली.
या संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आला. मॅन्यूअल मस्टरचा वापर आणि दुसऱ्या ग्रामपंचायतीचे मस्टर वापरणे अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. या चौकशी अहवालात पुसद येथील तत्कालीन बीडीओ आणि तसेच प्रभारी बीडीओ यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय कृषी अधिकारी आर.पी. राठोड, कनिष्ठ सहायक एस.जी. पाटील, विस्तार अधिकारी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय निलंबित ग्रामसेवकाव्यतिरिक्त आठ जणांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 10 gramsevaks guilty with Pusad BDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.