शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

माळपठारातील १० गावांत तीन दिवसांपासून अंधार

By admin | Updated: April 8, 2016 02:26 IST

तालुक्यातील माळपठार भागात मंगळवारी झालेल्या वादळाने मारवाडी वीज उपकेंद्रांतर्गत येणारी १० गावे तब्बल तीन दिवसांपासून अंधारात आहेत.

वितरणचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये तीव्र संतापपुसद : तालुक्यातील माळपठार भागात मंगळवारी झालेल्या वादळाने मारवाडी वीज उपकेंद्रांतर्गत येणारी १० गावे तब्बल तीन दिवसांपासून अंधारात आहेत. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. तक्रार केल्यानंतरही वीज वितरण दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.माळपठारावरील मारवाडी उपकेंद्रांतर्गत मारवाडी, रोहडा, बेलोरा, पांढुर्णा केदारलिंग, छोटा बेलोरा, वाडी, वागजळी, कुंभारी आदींसह १० गावातील वीज पुरवठा मंगळवारी झालेल्या वादळात खंडित झाला होता. अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून ताराही तुटल्या आहे. या परिसराला मारवाडी उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. त्या ठिकाणीही बिघाड असल्याचे बोलले जात आहे. या बाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीला माहिती दिली. मात्र तीन दिवस झाले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले नाही. परिणामी १० गावे अंधारात बुडाली आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने उन्हाचा असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच पीठगिरण्या बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. विशेष म्हणजे माळपठार भागात असलेल्या वीज वितरणचे खांब आणि ताराही अतिशय जुन्या आहे. लोखंडी खांब पूर्णत: जंगले असून साधा वारा आला तरी वीज पुरवठा खंडित होतो. आता तर वादळातच वीज यंत्रणा कोलमडल्याचे दिसत आहे. वीज वितरणचे अधिकारी दुरुस्ती करण्याऐवजी नागरिकांची बोळवण करीत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी माळपठारातील नागरिक करीत आहे. (प्रतिनिधी)बेलोरा येथे नागरिकांच्या जीवाला धोकाबेलोरा : माळपठारावरील बेलोरा परिसरात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील वीज खांब जीर्ण झाले असून काही वीज खांबांच्या बुडाशी छिद्र पडले आहे. वादळात हे खांब केव्हाही कोसळू शकतात. वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती केली जात नाही. तसेच गत तीन दिवसांपासून या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच सागर मारकड यांनी दिला आहे. (वार्ताहर)