शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Video - जिल्हा परिषदेत पदाधिकारीविरूद्ध कर्मचारी वाद विकोपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:57 IST

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. पदाधिकारी विरूद्ध अधिकारी, कर्मचारी असा रंगलेला हा सामना कोणते वळण घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध नियमानुसार योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली

वाशिम - जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. पदाधिकारी विरूद्ध अधिकारी, कर्मचारी असा रंगलेला हा सामना कोणते वळण घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

यासंदर्भातील निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे, की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करीत असताना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी येवून जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला. सदर कागदपत्रे तपासणी करून २ मार्चला सकाळी १० वाजता पुरविण्यात येतील, असे त्यांना सांगितले. मात्र, गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध नियमानुसार योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ५ मार्चपासून कामबंद आंदोलन पुकारले असून, सदर आंदोलन कोणते वळण घेते, याकडे जिल्हा परिषदेसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, कार्याध्यक्ष रमेश गोटे, जिल्हा सचिव एच.जे. परिहार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कामबंद आंदोलनात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :washimवाशिम