शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पायउतार जिल्हा परिषद सदस्य सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:59 IST

Zilla Parishad members to go in Supreme Court सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च रोजीच्या निकालानुसार जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद सर्कल व १९ पंचायत समिती गणांमधील सदस्य पदांवरून पायउतार झाले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करूनच रितसर निवडणूक लढली. यात आमचा दोष काय, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित जि.प., पं.स. सदस्य लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने दिल्ली, मुंबईच्या वकिलांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जानेवारी २०२० मध्ये जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सर्कल व १०४ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यात १४ जिल्हा परिषद सर्कल ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव होते. दरम्यान, आसेगाव सर्कलमधून चंद्रकांत ठाकरे यांनी विजय मिळविला. यांसह कंझरा सर्कलमधून सुनीता कोठाळे, दाभा - दिलीप मोहनावाले, काटा - विजय खानझोडे, पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी, उकळीपेन - चरण गोटे, कवठा - स्वप्निल सरनाईक, गोभणी - पूजा भुतेकर, भर जहागिर - उषा गरकळ, कुपटा - उमेश ठाकरे, फुलउमरी - सुनीता चव्हाण, पांगरी नवघरे - रत्नमाला उंडाळ, भामदेवी - प्रमोद लळे आणि तळप बु. सर्कलमधून शोभा गावंडे यांनी निवडणुकीत यश मिळवून जिल्हा परिषदेत ‘एण्ट्री’ केली. यातील चंद्रकांत ठाकरे हे जि.प. अध्यक्षपद; तर विजय खानझोडे आणि शोभा गावंडे या दोघांनी सभापतीपद भुषविले. अशात ४ मार्च रोजी धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सर्वच सदस्यांवर पायउतार होण्याची वेळ ओढवली. राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व सदस्यांना नोटीस बजावून ४ मार्चपासूनच जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले व तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची अंतिम मुदत १९ मार्च असून, पायउतार झालेल्या जिल्हा परिषद सदस्य त्यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने विविध स्वरूपातील मुद्यांवर दिल्ली व मुंबईच्या वरिष्ठ वकिलांशी सातत्याने चर्चा सुरू  असून, लवकरच न्यायालयात याचिका दाखल होणार आहे. 

निवडणूक आयोगाने काढलेल्या नोटीफिकेशनचे पालन करून तथा रिक्त जागांवरच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी निवडणूक लढली. असे असताना अचानक ओबीसींच्या जागा रिक्त ठरवून संबंधित सर्वच सदस्यांना पायउतार करण्यात आले. हा एकप्रकारे अन्याय असून, नागपूर व धुळे येथील ओबीसी सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. वाशिम जिल्ह्याची याचिकाही लवकरच न्यायालयात दाखल होईल. त्यानुषंगाने आवश्यक मुद्यांचा सारासार विचार सुरू आहे.- चंद्रकांत ठाकरेओबीसी सदस्य तथा तत्कालीन जि.प. अध्यक्ष, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWashim ZPवाशीम जिल्हा परिषद