शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड - वाशिम मार्गावर अपघातात रिठद येथील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:35 IST

रिसोड (वाशिम) : भरघाव अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनास धडक दिल्याने तालुक्यातील रिठद येथील एका तरुण डॉक्टरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना२५ डिसेंबर रोजी रात्री १:३० वाजता रिसोड ते वाशिम मार्गावर वनोजा फाट्यावर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : भरघाव अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनास धडक दिल्याने तालुक्यातील रिठद येथील एका तरुण डॉक्टरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री १:३० वाजता रिसोड ते वाशिम मार्गावर वनोजा फाट्यावर घडली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अज्ञात वाहनचालक विरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. प्रविण किसन बोरकर (३०) असे मृतकाचे नाव आहे. रिसोड तालुक्यातील रिठद येथील डॉ. प्रविण किसन बोरकर हे कुंकवाचा कार्यक्रम आटोपून आपल्या काही मित्रांना रिसोड येथे सोडून एम. एच.३० ए टी ३४६ क्रमांकाच्या कारने २५ डिसेंबरला रात्री उशिरा आपल्या गावी रिठदकडे जात होते. रात्री १:३० वाजतादरम्यान वनोजा फाटा येथे एका अज्ञात वाहनाने कारला जबर धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तसेच कारचा अक्षरश: चुराडा झाला.या दुर्घटनेचा आवाज रस्त्यालगत असलेल्या वस्तीत गेल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. पोलीस पाटलाने या घटनेची माहिती रिसोड पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल खुळे यांनी आपले सहकारी मनोज ब्राह्मण व वाहनचालक आनंद काकडे यांच्यासोबत घटनास्थळ गाठुन पाहणी केली. या घटनेत डॉ. प्रवीण बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आले.राजु बोरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्याम कुलवंत करित आहेत. प्रतिष्ठाने बंदया दुर्घटनेची माहिती बुधवारी सकाळी वाºयासारखी पसरताच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने रिठद गाठले. गावातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात