शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:06 IST

नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नवरात्रोत्सवाला सुरूवात होत नाही; तोच महावितरणच्यावतीने भारनियमन घेण्याला सुरूवात झाली. नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला.सध्या जिल्ह्यात विजेच्या तुटीचे कारण समोर करून काही फिडरवरून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. नेमकी नवरात्रोत्सव, नवदुर्गा उत्सवाला सुरूवात होण्याच्या कालावधीतच भारनियमन घेतले जात असल्याने भाविकांच्या उत्सवावर विरजन पडत आहे. भाविकांसह शेतकºयांना त्रासदायाक ठरणारे भारनियमन रद्द करावे, भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करावा, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी सरकारच्या शेतकरीविरोधी व सर्वसामान्य जनतेविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सत्तेत आल्यानंतर लवकरच महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचे खोटे आश्वासन देणाºया भाजपा सरकारने आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांमार्फत राज्यशासनाला निवेदन देत भारनियमन तत्काळ बंद करावे अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने लवकरच जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शिंदे यांच्यासह पदाधिकाºयांनी दिला. यावेळी वाशिम पंचायत समिती सभापती गजानन भोने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव सोळंके, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गजानन गोटे, उपाध्यक्ष सागर म्हैसने, सिद्धार्थ सावध, मोहन इंगोले, बबन सावळे, सरपंच बद्री लाळगे, भारत पोळकर, अनिल शिंदे, गणेश देव्हडे, विवेक खानझोडे, निखिल वानखेडे, गजानन शिंदे, मोहिउद्दीन खतीब, रामेश्वर इढोळे, बाळू गोटे, मनोज कालवे, गजानन वायचाळ यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणcongressकाँग्रेस