शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकरी स्वत:च उत्पादन घेऊन करताे विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:04 IST

Enovative Farmer  खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली.

ठळक मुद्देमातीमाेल भाव पाहता स्वत: भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. ऑर्डर घेऊन या युवा शेतकऱ्याने उन्नती साधली आहे.

-  नंदकिशाेर नारेवाशिम  :  शेती करणे दिवसेंदिवस कठिण हाेत आहे. अशा परिस्थितीत  खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली.  ‘सेंद्रिय भाजीपाला ’ व्हाॅट्‌स ॲप ग्रुप तयार करून पिकवलेल्या मालाची स्वत: विक्री सुरू केली. हर्रासीमध्ये भाजीपाल्याला मातीमाेल भाव मिळत असल्याने त्यांने ही शक्कल  लढवून व्हाॅट्‌सॲप ग्रुपवर दरराेज उपलब्ध भाजीपाला पाेस्ट करणे व त्यावरच ऑर्डर घेऊन या युवा शेतकऱ्याने उन्नती साधली आहे.सद्यस्थितीत पिकांचे विविध संकटांमुळे हाेणारे नुकसान पाहता शेती करणे कठिण झाले आहे. परंतु, राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करून भाजीपाला उत्पादन घेतले. आधी भाजी बाजारात हर्रासीत माल नेला. परंतु, भाजीपाल्याला मिळत असलेला मातीमाेल भाव पाहता कृषी अधीक्षक शंकर ताेटावार व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वत: भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी व्हाॅट्‌सॲप ग्रुप तयार करून त्यामध्ये दरराेज उपलब्ध भाजीपाल्याची लिस्ट टाकणे सुरू केले. याला लाभलेला प्रतिसाद पाहता एका ग्रुपची सदस्य मर्यादा संपुष्टात आल्याने आता दुसरा ग्रुप तयार केला जात आहे.  या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक केले जात असून, दरराेज या ग्रुपमध्ये सकाळपासून भाजीपाला घेणाऱ्यांची यादी पाेस्ट हाेताना दिसून येत आहे.

रानभाज्यांचेही उत्पादन घेणे सुरू केले!गत एक वर्षापेक्षा जास्त दिवसापासून ग्रुपवर एकाच भाजीची यादी पाेस्ट करताना ग्राहकांनाही काही नवीन मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम हाेत असल्याचे दिसून आल्याबराेबर राऊत यांनी रानभाज्यांचे उत्पादन घेणे सुरू केले. आजच्या घडीला त्यांच्याकडे बाजारात उपलब्ध नसलेल्या रानभाज्यांसह इतर भाज्या माेठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे असलेला काही भाजीपाला जाे बाजारात सहसा मिळून येत नाही यामध्ये गुळवेल, लेटूस, मुळा शेंग, बीट, काळी मिरचीचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी