शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बांबर्डाच्या युवा शेतकऱ्यांनी तयार केले हातपेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड: कारंजा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या समुहाने शेतकऱ्यांना सोयीचे आणि कमी खर्चात, कमी वेळेत अधिक पेरणी करता येऊ शकणारे हात पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे ट्रॅक्टर, बैलजोडी, मजुर यांच्यासाठी लागणारा मोठा खर्च निम्म्याहूनही अधिक कमी झाला असून, हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.बांबर्डा कानकिरड येथील युवा ...

ठळक मुद्देअरविंद कानकिरड आणि श्रीधर कानकिरड यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी इतर युवा शेतकऱ्यांच्या सहकार्याने जेनेसिस इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप सुरू केले. हे यंत्र पुढे ढकलत असताना त्यामधून बीजे पडून आपोआप पेरणी पूर्ण होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड: कारंजा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या समुहाने शेतकऱ्यांना सोयीचे आणि कमी खर्चात, कमी वेळेत अधिक पेरणी करता येऊ शकणारे हात पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे ट्रॅक्टर, बैलजोडी, मजुर यांच्यासाठी लागणारा मोठा खर्च निम्म्याहूनही अधिक कमी झाला असून, हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.बांबर्डा कानकिरड येथील युवा शेतकरी अरविंद कानकिरड आणि श्रीधर कानकिरड यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि मानवचलित असे यंत्र तयार करण्याचा त्यांचा पूर्वीपासूनच मानस होता. या संकल्पनेतून त्यांनी इतर युवा शेतकऱ्यांच्या सहकार्याने जेनेसिस इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप सुरू केले आणि हात डवऱ्याच्या धर्तीवर हातपेरणी यंत्र विकसीत केले. हाताने ढकलता येणाऱ्या या पेरणी यंत्रावर त्यांनी पेरणीचे बियाणे टाकण्यासाठी एक पेटी तयार केली असून, हे यंत्र पुढे ढकलत असताना त्यामधून बीजे पडून आपोआप पेरणी पूर्ण होते. या यंत्राच्या आधारे कपाशी, सोयाबीन, तूर, मुग, उडिद, मका, ज्वारी, बाजरी, तीळ तसेच भाजीपाला बियाण्यांची अतिशय कमी वेळेत व कमी खर्चात पेरणी करता येते. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बैलजोडीची व्यवस्था नसते, तसेच ट्रॅक्टरने पेरणी करण्याचा खर्चही त्यांना परवडणारा नसतो. सद्यस्थितीत दोन एकर कपाशीच्या पेरणीसाठी किमान सहाशे रुपये खर्च येतो; परंतु बांबर्डा येथील युवा शेतकºयांनी विकसीत केलेल्या हातपेरणी यंत्रामुळे दोन एकर क्षेत्रात अवघ्या दोनशे रुपयांत पेरणी पूर्ण होत. या यंत्राद्वारे एक फुटापासून दोन फुट किंवा पाहिजे तेवढे अंतर ठेवून सहज पेरणी करता येते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकºयांसाठी हे पेरणी यंत्र अतिशय फायदेशीर ठरत आहे. हातपेरणी यंत्राबरोबरच या युवा शेतकºयांनी डवरणी, सरी पाडणे, हात फवारणी यंत्र शेत कूंपणाची चैन लिंक जाळी, अशी यंत्रेही तयार केली आहेत. अल्पभूधारक शेतकºयांसाठी सुक्ष्म तंत्रज्ञानाचा कसा फायदा होईल हा विचार करून हे शेतकरी वेगवेगळी यंत्रे तयार करण्यावर भर देत आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाFarmerशेतकरीagricultureशेती