शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कसदार शेतातून पिकलेली पिवळी हळद झाली काळी; अवकाळी पावसाचा जबर फटका

By सुनील काकडे | Updated: May 5, 2023 19:09 IST

सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर (ता.मालेगाव) परिसरातील असंख्य शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत.

वाशिम: सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर (ता.मालेगाव) परिसरातील असंख्य शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. मात्र, यंदा हळदीच्या दराने निच्चांक गाठण्यासह अवकाळी पावसाचा जबर फटका बसत शेतात पिकलेली हळद चक्क काळी पडली आहे. या हळदीला अगदीच कमी दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामातील पारंपरिक पिकांवरच विसंबून न राहता नगदी व हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळद लागवडीकडे शिरपूर परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, २०२१ मध्ये हळदीला अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाला. तीच स्थिती कायम राहण्याची आशा बाळगून शेतकऱ्यांनी हळदीचे सरासरी क्षेत्र वाढविले; मात्र २०२२ मध्ये हळदीचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले. हे चित्र सध्याही कायम आहे. अशातच अधूनमधून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतातील हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. उकडलेली हळद सडतेय; शेतकरी हतबलशेतात पूर्ण वाढ झालेली हळद काढून घेण्यात आली. उकडल्यानंतर सुकवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे प्रखर सूर्यप्रकाश मिळणे अशक्य झाल्याने हळद सडून काळी पडत आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. हळद उकडून सुकवायला ठेवली जात आहे; मात्र यादरम्यान अचानक पाऊस कोसळत असल्याने हळद सडायला लागली आहे. शासनाने तत्काळ सर्वे करून इतर पिकांप्रमाणे हळदीलाही नुकसान भरपाई द्यायला हवी. - कैलास गावंडे, हळद उत्पादक शेतकरी मी गेल्या काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेत आहे. फायदा देखील बऱ्यापैकी होत आहे; मात्र यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने हळद सुकवायला संधीच मिळणे अशक्य झाले आहे. परिणामी, हळद काळी पडून सडत आहे. - संजय देशमुख, हळद उत्पादक शेतकरी.  

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी