वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात मुबलक पर्जन्यमान झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्तविले आहेत.वाशिममध्ये साधारणत: गत दोन वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून एकबुर्जी या मध्यम प्रकल्पावरून नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. दरम्यान, हा वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान होऊन एकबुर्जी प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी ‘लोकमत’ला दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम अंतीम टप्प्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:27 IST
वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम अंतीम टप्प्यात!
ठळक मुद्दे नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे.