शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शेत मशागतीची कामे प्रलंबित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 17:13 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकºयांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही.

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही. तुरीच्या शेंगा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणा-या तुराट्या आजही अनेक शेतांमध्ये तशाच दिसून येत आहेत. तथापि, नैसर्गिक आपत्तीसह उद्भवलेल्या विविध स्वरूपातील संकटांमुळे शेतकरी अक्षरश: जेरीस आल्यानेच आगामी खरिप हंगामात पेरणीचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काडी-कचरा वेचणे, वखरणी, नागरणी, कोळपणी यासह इतर स्वरूपातील शेत मशागतीची कामे सुरू होतात. यंदा मात्र जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरणीलायक क्षेत्रावर ही कामे सुरू झालेली नाहीत. गत महिन्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतक-यांच्या गहू, हरभरा व काही प्रमाणात तुरीचे अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसून शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीचाही विशेष फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम आगामी खरिप हंगामावर जाणवण्याची शक्यता असून जवळ पैसाच नसल्याने शेत मशागत आणि पेरणीसाठी लागणा-या साहित्यांची जुळवाजुळव कशी करणार, असा प्रश्न शेतक-यांसमोर उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी