लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरोग्य सेवांच्या बाबतीत अद्याप परिपूर्ण नसलेल्या वाशिम जिल्ह्यातील महिला रुग्णांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून येथे स्त्री रुग्णालयाची टोलेजंग इमारत उभी झाली. मात्र, काम पूर्ण होवून एक वर्ष होत असतानाही या रुग्णालयाचे लोकार्पण अद्याप झालेले नाही. रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी पदभरतीबद्दलही शासनस्तरावरून कुठलीच ठोस हालचाल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने वाशिममध्ये १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास मंजूरी देवून त्याकरिता लागणारा कोट्यवधी रुपये निधी दिला. त्यातून रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, पुढची प्रक्रिया आणि आवश्यक कर्मचारी देण्यासंबंधी शासनाकडून उदासिनता बाळगली जात असल्याने या रुग्णालयाच्या लोकार्पणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील महिला रुग्णांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
वाशिमच्या स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:27 IST
वाशिम : काम पूर्ण होवून एक वर्ष होत असतानाही या रुग्णालयाचे लोकार्पण अद्याप झालेले नाही.
वाशिमच्या स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण रखडले!
ठळक मुद्देवाशिममध्ये १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास मंजूरी देवून त्याकरिता लागणारा कोट्यवधी रुपये निधी दिला.शासनाकडून उदासिनता बाळगली जात असल्याने या रुग्णालयाच्या लोकार्पणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.