शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अरक येथील यात्रेत केला जातोय लेकीबाळींचा सन्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:36 PM

सायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. 

- नारायण अव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, या भुमीत याञेची रेलचेल आणि प्रत्येक याञेचे वेगवेगळे महत्व आहे. रक येथील यात्रेत महिलांना सन्मानीत करुन एकात्मतेचे दर्शन घडविले जाते.अरक येथे एका दशकापासून जगदेश्र्वर संस्थानच्यावतीने याञेस प्रारंभ करण्यात आला. तसे अरक हे गाव विविध जाती धर्मात विखुरलेले असून, राजकीय गटतट, सर्वच पक्षाची बॅनरबाजी आणि एका गावात राहूनही चांगल्या किंवा वाईट प्रसंगातही हेवेदावे. मात्र १० वर्षापूूर्वी जगदेश्र्वर संस्थानच्यावतीने महाशिवराञी निम्मित एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व जातीधर्माच्या लेकीबाळी कोणकोणत्या गावात आहेत, याचा मागोबा घेतला आणि सुरूवात झाली लेकीबाळींना याञेला आनण्याची. प्रत्येक घरात कासोदूर असलेली मुलगी दिसू लागल्याने, महाशिवराञीला जणू दिवाळीच आहे का?असे जाणवू लागले. माहेरी आपला सन्मान होतोय या भावनेतून गावातील लेकीबाळी यात्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होतात. जगदेश्र्वर संस्थानेही कोणताही भेदभाव न ठेवता लेकींचा साडी चोळी देवून बहीन-भावाच्या नात्या प्रमाणे गोड भोजनाची मेजवानी दिली. एकात्मतेचे दर्शन घडविणारी ही परंपरा आजही जोपासली जात आहे. ५ मार्च रोजी अरक येथे ही यात्रा भरणार असून कासोदुर असलेल्या लेकीबाळी यात्रेला येणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा