शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षक स्वेच्छेने स्विकारू शकतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 15:32 IST

सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांवरील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास, नियमानुसार सदर पदाचा प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सोपविला जातो. सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास आणि प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर या पदाचा प्रभार यापुढे तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास देण्यात यावा, असे आदेश अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी २६ सप्टेंबर रोजी काढले. या आदेशाची प्रत विभागातील पाचही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या शाळांवर मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून या पदांचा प्रभार अन्य सेवाज्येष्ठ असणाºया शिक्षकांकडे सोपविला जातो. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेवर मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही अथवा रिक्त आहे, त्या शाळेवरील मुख्याध्यापक पदाचा प्रभार देताना सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास संबंधित शिक्षिकेकडे प्रभार सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे. तसे आदेश अमरावतीच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले. एखाद्या शाळेवर कार्यरत शिक्षकांमध्ये सर्व महिला शिक्षिका असल्यास नियमानुसार या शाळेवरील मुख्याध्यापक पदाचा प्रभार मात्र सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकांकडेच राहणार आहे. महिला शिक्षकांना आता स्वच्छेने मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वत:कडे ठेवायचा की शाळेतील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सोपवायचा, असे दोन पर्याय खुले आहेत.सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार सोपविण्यात यावा, अशा लेखी सूचना अमरावती विभागातील प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत.-अंबादास पेंदोर,शिक्षण उपसंचालक, अमरावती.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकSchoolशाळा