शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाहकांच्या विश्रामगृहाचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:53 IST

वाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे. मात्र, साधारणत: ८ वर्षांपूर्वी वाशिमच्या आगार परिसरात सुरू झालेले तथा ‘लेंटल लेव्हल’पर्यंत येऊन बंद पडलेले काम अद्यापपर्यंत सुरू होऊ शकले नाही. परिणामी, महिला वाहकांना जाणवणारी अडचण आजही कायम असल्याने त्यांच्यातून आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराप्रती रोष व्यक्त होत आहे. कधीकाळी केवळ पुरूषांचीच मक्तेदारी असणाºया विविध क्षेत्रांमध्ये आज महिला पूर्ण ताकदीने कार्य करित आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित असलेल्या सोयी-सुविधा पुरविण्याकामी प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. वाशिमच्या एस.टी. आगार परिसरात साधारणत: ८ वर्षांपूर्वी महिला वाहकांकरिता सुसज्ज विश्रामगृह इमारत उभारण्यासाठी पुरेसा निधी मंजूर झाला. त्यातून ‘लेंटल लेव्हल’पर्यंत काम पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर आजतागायत हे काम ८ वर्षांपूर्वीच्याच स्थितीत पडून असल्याचे दिसून येत आहे. इमारतीवर स्लॅब टाकणे, आतून-बाहेरून प्लस्टर करण्यासह अन्य सुविधा पुरविण्यात आल्यास महिला वाहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नसल्याचे दिसून येत आहे.महिला वाहकांच्या विश्रामगृहाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी विभाग नियंत्रकांनी देखील कामाची पाहणी केली. हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न आहे.- व्ही.एम.इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ