लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांत तणावाचे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत गंभीर आणि तीव्र स्वरूपाच्या रक्तदाबाची समस्या महिलांतच अधिक असल्याने हा निष्कर्ष निघत आहे.जिल्ह्यात आराेग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अभियानांतर्गत आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सौम्य रक्तदाबाच्या समस्येत महिलांचे प्रमाण १४.४ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण १६.२ टक्के आहे, गंभीर रक्तदाबाच्या समस्येत महिलांचे प्रमाण ४.७ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण ३.२ टक्के आहे, तसेच तीव्र रक्तदाबाच्या समस्येत महिलांचे प्रमाण २१.९ टक्के आणि पुरुषांचे प्रमाण २१.०० टक्के असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यात करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणात रक्तदाबाच्या समस्येत महिलांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.महिलांच्या तणावाची मात्र वेगवेगळी कारणे असू शकतात. - डॉ अविनाश आहेर, जि.आ. अधिकारी