शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील महिला व्यापाऱ्याकडून ६९ अडत्यांची ५४ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:23 IST

५४ लाखांनी फसवणूक केल्याी तक्रार अडते असोसिएशनने कारंजा शहर पोलिसांत दाखल केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत व्यापारी म्हणून कार्यरत असलेल्या ओम एंटरप्रायजेसच्या संचालक संध्या धन्यकुमार चौधरी यांनी ५९ अडत्यांची सुमारे ५४ लाखांनी फसवणूक केल्याी तक्रार अडते असोसिएशनने कारंजा शहर पोलिसांत दाखल केली. यामुळे मोठी खळबळ माजली असून दोषीवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.फसवणूक झालेल्या अडत्यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की ओम एंटरप्रायजेसच्या संचालक संध्या चौधरी (रा. यशवंत कॉलनी, कारंजा लाड) यांनी २५ नोव्हेंबर २०१९ ते ३ डिसेंबर २०१९ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य लिलावात सहभागी होऊन हरभरा, सोयाबीन, उडीद, मुंग आणि तूर आदी शेतमालाची ५९ अडत्यांमार्फत खरेदी केली. त्याची रक्कम ५४ लाख रुपये होते. ही रक्कम देण्याबाबत व्यापारी संध्या चौधरी यांनी सातत्याने टाळाटाळ करून कारंजा येथून पोबारा केला. यासंदर्भात बाजार समितीकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली. व्यापारी संध्या चौधरी यांच्याविरूद्ध तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अडते असोसिएशनचे अध्यक्ष गौरीशंकर पापडे, ज.मा. देवडा, जी.ए. पापडे, सुधीर जाधव, सोमनाथ पेंटे, विशाल चांडक, ओंकार पाढेण, एस. पाढेण आदिंनी केली.

अडत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन व्यापारी संध्या चौधरी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून रितसर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकरणाच्या चौकशीअंती संबंधित व्यापाºयावर निश्चितपणे ठोस कारवाईचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवण्यात येईल.-निलेश भाकरेसचिव, बाजार समिती, कांरजाअडत्यांच्या फसवणुकीबाबत व्यापारी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल.-सोमनाथ जाधवठाणेदार, कारंजा पोलिस स्टेशन

 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीKaranjaकारंजा