शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:51 IST

महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे घणाघाती प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत शनिवारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करणाºया गद्दारांना टकमोक टोकावरून ढकलून दिले जायचे. तशीच काहीशी परिस्थिती सद्या निर्माण झाली असून जनतेचे मत म्हणजेच टकमक टोक असून त्याची प्रचिती गद्दारांना यंदाच्या निवडणूक नक्की येणार आहे. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे घणाघाती प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत शनिवारी केले. यायोगे त्यांनी अप्रत्यक्षपणे सेनेवर निशाना साधला.भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर वाशिम, कारंजा येथील भाजपाच्या आमदारांसह महायुतीमधील पदाधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आता विधानसभेत त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोबत राहावे. महायुतीत जी जागा ज्या पक्षाला सुटली, त्याच पक्षाच्या चिन्हाखाली सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. असे होत नसेल तर संबंधितांची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बंडखोर व त्यांना मदत करणाºयांना दिला. आमदार राजेंद्र पाटणी यांनी याप्रसंगी भाजपाने जिल्ह्यातील विकासकामांसाठी दिलेला निधी व त्यातून झालेल्या कामांबाबत मनोगत व्यक्त केले. काँग्रेस-रा.काँ.ने जाहीरनाम्या वाटली आश्वासनांची खैरात!यंदाच्या विधानसभा निवडणूकीत यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नसणाºया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्व प्रकारच्या आश्वासनांची अक्षरश: खैरात वाटली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ताजमहाल बांधून देऊ आणि प्रत्येकास चंद्रावर किमान एक फ्लॅट देऊ, अशी केवळ दोन आश्वासने त्यात नाहीत, अशी मिश्कील टिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019washimवाशिम