शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाहनांचा विचित्र अपघात; चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:29 IST

नागपूरवरून औरंगाबादकडे जाणा-या सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने विरूद्ध दिशेने येणा-या दोन वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरील किन्हीराजानजीक २६ जुलै रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास घडली.

किन्हीराजा (वाशिम) - नागपूरवरून औरंगाबादकडे जाणा-या सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने विरूद्ध दिशेने येणा-या दोन वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरील किन्हीराजानजीक २६ जुलै रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक बाबाजी मसकर (५५),  रा. मड (जुन्नर), विशाल मडवे (२५) रा. मड (जुन्नर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.औरंगाबाद ते नागपूर महामार्गावरून एम.एच. ३४ बी.जी. ९९९७ क्रमांकाचे सिमेंट मिक्सर असलेले वाहन औरंगाबादकडे जात होते. त्याचवेळी एम.एच. ०६ जी. ९३०१ क्रमांकाचे पिकअप वाहन व व एम. एच. १४ एफ. टी. ४९६ क्रमांकाचे पीकअप वाहन हे विरुद्ध दिशेने जुन्नर येथून फुले घेऊन नागपूरकडे जात होते. किन्हीराजा गावापासून तीन किमी अंतरावर असेलल्या एका हॉटेलजवळ सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाने समोरील दोन्ही पिकअप वाहनांना जबर धडक दिली. यामध्ये एक पिकअप वाहन रस्त्यावरच उलटले तर दुसरे पिकअप वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.या अपघातानंतर सिमेंट मिक्सर असलेल्या वाहनाचा चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले. रस्त्याच्या कडेला उलटलेल्या वाहनाचे चालक बाबाजी मसकर (५५),  रा. मड (जुन्नर), विशाल मडवे (२५) रा. मड (जुन्नर) हे दोन्ही चालक व वाहक गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले. रस्त्यावर उलटलेल्या वाहनाचे चालक गणेश शिंदे (३२) रा. खामगाव व राहुल चकवे (२०) रा. पारगाव हे दोघेही किरकोळ जखमी झाले. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेचा पुढील तपास जउळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण साळवे यांच्या मार्गदर्शनात किन्हीराजा चौकीचे कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात