४० वर्षांची परपंरा: गजानन महाराज संस्थानचा उपक्र म रिसोड: आठवडी बाजारात विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यापारी, ग्राहकांची तहान जागेवर जाऊन भागविण्यासाठी रिसोड येथे फिरत्या पाणपोईचा अभिनव उपक्रम गजानन महाराज संस्थान रिसोडच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यात मोप येथील ब्रिजलाल बगडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. गेली ४० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रखरखत्या उन्हात प्रत्येकच जीव पाण्यासाठी कासावीस होतो. अशात एखादवेळी जवळपास पाण्याची सोय नसली, तर हाती असलेले महत्त्वाचे काम सोडून पाण्यासाठी पळावे लागते. प्रामुख्याने बाजारातील ग्राहक व्यावसायिक, पाण्याची सोय नसलेल्या कार्यालयात कामासाठी आलेले लोक आदिंना ही समस्या जाणवते. अशाच लोकांची तहान भागविण्यासाठी मोप येथील डॉ.ब्रिजमोहन बगडे यांनी गजानन महाराज संस्थान मोपच्या माध्यमातून शहरात गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी वाटर फिल्टरच्या कॅनच्या थंडगार पाण्याची व्यवस्था फिरत्या पाणपोईव्दारे केली आहे. डॉ.बगडे, स्वत:च्या वाहनातून आणलेल्या कॅनचे पाणी ह्यडिस्पोजेबलह्ण ग्लासच्या माध्यमातून बाजारात व गर्दीच्या ठिकाणी जावून लोकांना पाजतात. शहरात चौकात बऱ्याच ठिकाणी पाण्याची किंवा पाणपोई आहे. मात्र डॉ. बगडे यांनी थेट तहानलेल्यास व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याची तहान भागविण्यासाठी फिरती पाणपोईच रिसोड येथील आठवडी बाजारात सुरू केली आहे. विविध ठिकाणाहून येथे येणाऱ्या जनतेसह व्यापाऱ्यांना दिवसभर ते पाणी पाजत फिरतात. त्यांचा हा उपक्रम खरोखरच मानवतेची जाण असलेलाच आहे.
रिसोड येथे फिरती पाणपोई
By admin | Updated: April 23, 2017 19:39 IST