शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभातूनच होतोय पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:36 IST

इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. इंझोरी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. आता या ठिकाणी म्हसणी येथील जीवन प्राधीकरणच्या योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत असून, यासाठी जामदरा घोटी येथून मोटारपंपाद्वारे जलकुंभात पाणी सोडले जात आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गावातील लोकांना मुबलक पाणी पुरवठाही होत आहे; परंतु ही योजना राबविताना पाण्याच्या बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. इंझोरी येथील जलकुंभात पाणी सोडण्यासाठी मोटारपंप सुरू केल्यानंतर ते बंद करण्याची तसदीच घेतली जात नाही. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचा अपव्यय सुरू होतो. जवळपास दोन ते तीन तास जलकुंभावरून पाण्याच्या धारा कोसळतच राहतात. यामुळे प्रत्येक वेळी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, जीवन प्राधीकरण किंवा इतर संबंधित यंत्रणेकडून याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. ग्रामपंचायतींनी या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजनांचे प्रस्तावही पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात आले आहेत, तर दुसरीकडे इंझोरी येथे अडाण प्रकल्पातील मुबलक साठ्यामुळे योग्य पाणी पुरवठा होत असतानाही प्रशासनाकडूनच त्याचा अपव्यय केला जात आहे. 

इंझोरी येथील जलकुंभातून पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहितीच आपल्याला मिळाली नाही. आता याबाबत संबंधित यंत्रणेला कळवून हा प्रकार तातडीने बंद करण्याची सुचना करू.-किसन वडाळग्रामसेवक, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी