शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वारा प्रकल्पाचे पाणी पूस नदीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:19 IST

देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे. यामुळे चार गावांतील रब्बी पिके संकटात सापडली असून, प्रकल्पाच्या सिंचन प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने वारा जहॉगिर प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षीप्रमाणेच यंदाही काठोकाठ भरला आहे; परंतु या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होऊन तो ६० टक्क्यांवर आला आहे. यामुळे याच प्रकल्पावर उपसा सिंचन पद्धतीने गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी पूस नदीत सोडण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होण्याची भितीही आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्याऐवजी कालव्याचे काम पूर्ण करून कालव्याद्वारेच पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. चार गावच्या शेतकºयांसह शिवसंग्रामचे निवेदनवारा प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडण्यात येत असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकºयांची रब्बी पिके संकटात सापडली असून, हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसंग्रामचे वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष महादेव उगले यांच्या नेतृत्वात चार गावच्या शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. प्रकल्पातील पाणी पूस नदीत सोडणे त्वरीत बंद न केल्यास शिवसंग्राम आणि शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. 

 

वारा जहॉगिर प्रकल्पात सद्यस्थितीत ६७ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या खालच्या भागातील शेतकºयांना पाणीकर घेऊन चार वेळा पाणी देण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यापैकी तीन वेळा पाणी सोडण्यात आले असून, आणखी एक वेळा पाणी सोडण्यात येणार आहे. ही पाळी झाल्यानंतर त्यांना पाणी सोडले जाणार नाही. -शिवाजीराव जाधव, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमDamधरणriverनदी